छत्रपती शिवरायांच्या इतिहासातला अफझल खानाच्या वधाचा देखावा साकारण्यावरुन पुण्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण पुणे पोलिसांनी हा जिवंत देखावा साकारण्यास मनाई केली. तर मुंबईत नुकत्याच झालेल्या दहीहंडी उत्सवात एका पथकानं अफझल खानाच्या वधाचा देखावा साकारला होता. त्यामुळे दहीहंडीत चालतं, ते गणेशोत्सवात का नाही? आणि आपला इतिहास इथे नाही तर काय पाकिस्तानात जाऊन दाखवायचा का? असा सवाल संगम तरुण मंडळानं उपस्थित केलाय.